वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये आहेत. आज ते पुन्हा एकदा रोड शो करणार आहेत. पण त्याआधी सकाळी ते गढवाघाट आश्रम पोहोचले. तेथे त्यांनी गायींना चारा खाऊ घातला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्रमकडून रुद्राक्षाच्या माळा घालण्यात आल्या. पंतप्रधान मोदी येथे दीक्षा देखील घेतील. त्यानंतर ते ८०० मीटरपर्यंत रोड शो करणार आहेत. रामनगर चौक ते शास्त्री चौक रोड शो मोदी करणार आहेत. यूपी निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी मतदान होणार आहे. 


पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री गेल्या ३ दिवसांपासून बनारस आणि आजुबाजूच्या भागात जोरदार प्रचार करत आहे. जास्तीत जास्त जागा निवडूण आणण्यासाठी ते प्रयत्न सुरु आहेत.