नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'वसंताचं आगमन झालं आहे. जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा माणूस त्याचा आनंद घेतो. काही दिवसांपूर्वीच भारताने १०४ सॅटेलाईट लॉन्च केले. संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलं. इस्रोने देशाचं नाव उंचावलं. या वर्षी देशात २७०० लाख टन धान्याचं उत्पादन झालं जे एक रेकॉर्ड आहे. असं वाटतं की, शेतकरी रोज पोंगल आणि वैशाखी साजरा करत आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी म्हटलं की, 'वसंत ऋतू सुरु झाला आहे. झाडांची पाने पडतात. नवी फुलं उगवतात. शेतात फुलं शेतकऱ्यांना सुखाचा अनुभव देतात. महाशिवरात्री आणि होळी लोकांना नवा उत्साह देतात.


"इस्रोने अनेक देशांचे १०४ सॅटेलाइट स्पेसमध्ये पाठवून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. "इस्रा की कॉस्ट एफिशिएंट टेक्नोलॉजी जगासाठी आश्चर्य आहे. सॅटेलाइट कार्टोसेट-2डीने शेतकऱ्यांना खूप मदत मिळेल. त्याने काही फोटो पाठवले आहेत. संपूर्ण मिशनमध्ये महिला वैज्ञानिकांनी देखील मोठी भूमिका पार पाडली.


भारताने काही दिवसांपूर्वी इंटरसेप्टर मिसाईलची देखील टेस्ट केली. यामुळे देशाची सुरक्षा आणखी मजबुत होईल. ही मिसाईल २००० किलोमीटरपासून येणाऱ्या दुश्मनांच्या मिसाईलला देखील संपवेल.


मोदींनी म्हटलं की, विज्ञानाचं नवं रुप नव्या युगाला जन्म देतोय. देशाला अनेक वैज्ञानिकांची गरज आहे. गांधीजी म्हणायचे की, विज्ञानाच्या टेक्नोलॉजीचा वापर सामान्य माणसाच्या जीवनात कशा प्रकारे सुरळीत बनवतं. त्यासाठी काम केलं पाहिजे. सरकारने गरीब मच्छिमारांसाठी अॅप बनवलं आहे. यामुळे त्यांना समुद्रात येणाऱ्या धोकादायक वादळाबाबत माहिती मिळते.