कोलकाता : रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तृणमूलचेच खासदार तपास पाल यांनाही अटक करण्यात आली आहे. रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याची ईडीकडूनही चौकशी सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेनंतर मात्र ममता बॅनर्जी मोदी सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना अटक केली पाहिजे, मोदींना भारताचं राजकारण कळत नाही, अशी टीका ममता बॅनर्जींनी केली आहे. अनेक राजकीय पक्ष घाबरल्यामुळे ते बोलायला घाबरत आहेत. देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती असल्याचंही ममता म्हणाल्या आहेत.


आमच्या नेत्यांना अटक केल्यानंतर नोटबंदीला आम्ही विरोध करणार नाही, असं सरकारला वाटत असेल तर ते चूक आहे. नोटबंदीविरोधात 9 जानेवारीला कोलकत्यात आरबीआय कार्यालयाबाहेर तर 10 आणि 11 तारखेला दिल्लीतल्या आरबीआयबाहेर आंदोलन करणार असल्याचं ममतांनी सांगितलं आहे.