मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि देशभरात सगळीकडे एकच खळबळ माजली. त्यानंतर सर्व बँकांमध्ये लांबच लांब रांगा दिसू लागल्या. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांकडून कौतूक करण्यात आलं. देशातला काळा पैसा मुख्य प्रवाहात यामुळे येईल असं अनेकांचं मत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३१ डिसेंबरनंतर आणखी एक असाच मोठा निर्णय घेण्याचं सूचक वक्तव्य कर्नाटकात एका सभेत बोलतांना केलं. त्यामुळे मोदींचं पुढचा निर्णय काय असू शकतो याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली त्यामध्ये एक सूचक गोष्टी समोर आली. कदाचित ३१ डिसेंबरनंतर संपूर्ण चलनच नव्या रुपात येईल अशी शक्यता नाकारता येत नाही. जाहिरातीत तरी सध्या तसंच दिसतंय. त्यामुळे इतर नोटा देखील लवकरच नव्या रुपात पाहायला मिळाल्यात तर आर्श्चय वाटायला नको.