नवी दिल्ली : संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांची उपस्थिती गेल्या काही काळात कमी होती, त्यावरुन मोदी नाराज आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेतलं कामकाज सुरू करण्यासाठी एकूण खासदारांच्या संख्येपैकी एक दशांश खासदार म्हणजे ५५ खासदारांची उपस्थिती आवश्यक असते. हा कोरम भरला की मगच लोकसभेचं कामकाज सुरू करता येतं. 


हा कोरम भरला नाही, तर लोकसभेत एक घंटा वाजवली जाते. काल सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे लोकसभेचा कोरम भरला नाही आणि ही घंटा वाजवण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे नाराज झालेल्या मोदींनी आज खासदारांची बैठक घेऊन खरडपट्टी काढली.