भोपाळ : "70 वर्षं स्वातंत्र्याची, याद करो कुर्बानी" या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरातल्या भावरा या चंद्रशेखर आझाद यांच्या गावी आझाद यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावरा इथं जाहीर सभा झाली. या सभेला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.


यावेळी बोलताना काश्मीरच्या प्रश्नाला पंतप्रधानांनी हात घातला. काश्मीरमध्ये मुठभर लोकं तिथल्या तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोंदींनी केला. प्रत्येक भारतीयाचं काश्मीरवर प्रेम आणि विकासाच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असंही ते म्हणाले.