नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असेल असे अनेकांना वाटत असेल मात्र सत्य पूर्ण वेगळे आहे. नुकत्याच माहितीच्या अधिकारांतर्गत मोदींच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला मिळालेल्या उत्तरात पंतप्रधान मोदींच्या संपत्तीबाबत माहिती मिळालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींकडे 89 हजार 700 रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात 2 लाख 9 हजार 296 रुपये आहेत. तसेच बँक एफडी 51 लाख 27 हजार 428 रुपयांची आहे. एल अँड टीचा 20 हजार रुपयांचा बाँड आणि नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये 3 लाख 28 हजार 106 रुपये आहे. तसेच त्यांनी 1 लाख 99 हजार रुपयांची एलआयसी पॉलिसी काढलीये. 


पंतप्रधान मोदींच्या नावाने कोणतीही जमीन नाही. तसेच कारही नाही. त्यांच्या नावावर कर्जही नाहीये. मोदींकडे एकूण  मिळून 1 कोटी 73 लाख 36 हजार 996 रुपयांची संपत्ती आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत संपत्तीमध्ये यावर्षी 32 लाखांची वाढ झालीये. 


मोदींकडे आहेत सोन्याच्या 4 अंगठ्या


मिळालेल्या माहितीनुसार, मोदींकडे सोन्याच्या 4 अंगठ्याही आहेत. सध्या मोदींकडे असलेल्या सोन्याची किंमत 1 लाख 27 हजार 645 रुपये आहे.