भोपाळ :  पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यप्रदेशातील भाबरा येथील गल्ल्यांमधून चंद्रशेखऱ आझाद यांच्या स्मारकाकडे जात होते. त्यावेळी मुस्लिम बहुल भागात त्यांच्या ताफ्याला घेरण्यात आले आणि मोदी मोदीचे नारे लावण्यात आले.  हे पाहून सुरक्षा एजन्सींची भंबेरी उडाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक पंतप्रधान मोदींचा ताफा थांबला आणि काही समजण्याच्या आत पंतप्रधान मोदी लोकांमध्ये गेले. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना निराश केले नाही. 


कारमधून उतरून त्यांनी वयस्क नागरिकांची उत्साहात भेट घेतली आणि हस्तांदोलन केले. काही वेळेसाठी मोदींची सुरक्षा करणाऱ्या टीमचे धाबे दणाणले होते.