नवी दिल्ली : अमेरिकेहून भारतात आलेल्या २७ अमेरिकेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सांगितली आहे. एच-1 बी वीजावर अटी अधिक कडक करण्याच्या ट्रम्प सरकारच्या निर्णयाबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेचे खासदारांनी पंतप्रधान मोदींना याबाबत त्यांची काय दूरदृष्टी आहे याबाबत भारताने ते स्विकारावं म्हणून अपेक्षा व्यक्त केली आहे.


पंतप्रधानांनी अमेरिकेच्या काँग्रेस सदस्यांसोबत चर्चा करतांना एच-1 बी वीजाचा मुद्दा उचलला आणि बोलता बोलताच सांगून टाकलं की, भारतीय प्रोफेशनल्सवर बंदी योग्य पाऊल नाही. हे पहिल्यांदा झालं ज्यावर मोदींनी चिंता सार्वजनिक केली. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्या बहुचर्चित निवडणुकीत केलेल्या आश्वासनाबाबतही आठवण करुन दिली आहे. अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी त्यांना सुनावलं.