पंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका
नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 डिसेंबर रोजी देशाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
पंतप्रधान मोदी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करत, 500, 1000च्या जुन्या नोटांच्या नोटबंदीची घोषणा केली होती.
यावेळी नरेंद्र मोदी हे अतिरिक्त प्रॉपर्टी, तसेच गैरमार्गाने कमवलेली प्रॉपर्टी अशा बेनामी संपत्तीबद्दल घोषणा करणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुढची नेमकी काय घोषणा करणार आहेत, याकडे देशवासियांचं लक्ष लागून आहे.