चंदिगड : ज्याप्रमाणे मोबाईल फोन तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे, त्याप्रमाणे योगालाही महत्वाचा भाग बनवा, असं आवाहन करताना दोन पुरस्कारांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्याआंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान  मोदींनी उपस्थिती लावली आणि योगाही केला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.  


या आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन पुरस्कारांची घोषणा केली. एक पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येईल. तर दुसरा हा राष्ट्रीय स्तरावर दिला जाणार आहे. तर पुढच्या वर्षी डायबेटीस मुक्तीचं लक्ष्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक वर्षी एक रोग दूर करण्यासाठी योग दिनी प्रयत्न करणार असल्याचं मोदींनी म्हटलंय. 


योगदिनाचा उत्साह पहायला मिळाला. त्याचबरोबर समाजापासून नेहमीच उपेक्षित राहिलेल्या किन्नर समाजानंही योगदिवस साजरा केला. तसंच पुढच्या वर्षी योगादिवस हा रामदेवबाबा आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत साजरा करण्याची ईच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. 



योगदिनाचा देशात उत्साह


१. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुंबई पोलिसांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली. बांद्रा रेक्शमेशनवर पोलिस महासंचालक देवेन भारती, मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहेता, दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायक शान यावेळी उपस्थित होते. 


२. नागपूरमध्ये दुस-या योगदिनाचा उत्साह दिसून आला. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींनीही यावेळी योगासनं केली. त्यांच्यासह नागपूरकरही योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 


३. कानपूरमध्ये संरक्षममंत्री मनोहर पर्रिकर यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी यावेळी काही योगासनंही केली. त्यांच्याबरोबर या योगदिनाच्या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागील झाले होती. 


४. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी भोपाळमध्ये दुस-या योगदिनाच्या कार्यक्रमात सहभार घेतला. त्यांनीही यावेळी योगासनं केली. 


५. केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनीही झारखंडमधील योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी नागरिकांबरोबर काही योगासनंही केली.