नवी दिल्ली : सहा दिवसांत पाच देशांचा झंझावाती दौरा आटोपून आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तान,  कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांशी संबंध दृढ करण्यासाठी मोदींनी हा दौरा केला. या दौऱ्यानंतर न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये भारतला स्थान मिळावं यासाठी अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोचा मजबूत पाठिंबा मिळालाय.


तर मिसाईल टेक्नोलॉजी ट्रान्सफर रिजीम या ३७ देशांच्या संघटनेत भारताचं स्थान पक्क झालंय. याशिवाय दौऱ्यावर अमेरिकन संसदेच्या संयुक्त सभागृहात मोदींनी केलेल्या भाषणाचं जगभरात कौतुक होतंय. अमेरिकन संसदेनं पास केलेल्या ठरावात मोदींचं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याचं म्हटलंय.