नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून शुक्रवारी विमानतळावर स्वतः पोहचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना विमानतळावर जाण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सामान्य वाहतुकीत पंतप्रधान विमानतळावर पोहचले.


पंतप्रधान मोदी यांनी VVIP कल्चरला बाजूला ठेऊन सामान्य ट्रॅफीकमध्ये लोककल्याण मार्गाने दिल्ली एअरपोर्टला पोहचले. त्यानंतर त्यांनी स्वतः शेख हसीना यांचे स्वागत केले.  


शेख हसीना ४ दिवसाच्या भारत दौऱ्यावर 


बांगलादेशच्या पंतप्रधान चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. त्या सात वर्षांनंतर भारतात आल्या आहेत. 


भारत करू शकतो ५० कोटी डॉलरच्या कर्जाची घोषणा 


हसीना शनिवारी मोदीशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दरम्यान भारत सैनिक साहित्य खरेदी करण्यासाठी ५० कोटी डॉलर बांगलादेशला कर्जाऊ देण्याची घोषणा होऊ शकते. 


हसीना यांचा पहिली द्विपक्षीय दौरा


पंतप्रधान पदाच्या आपल्या कार्यकाळात हसीना पहिल्यांदा द्विपक्षीय भारत दौऱ्यावर आल्या आहेत.