नवी दिल्ली :  उरमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणावर १८ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर देशाच्या शूत्रांना कठोर शिक्षा देण्याची मागणी देशातून चौफर होऊ लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, उरी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडण्यात येणार नाही.  काल सर्जिकल स्ट्राईक करून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर चौफेर मोंदीचे कौतुक होत आहे. 


पण ऑपरेशन संपत नाही तोपर्यंत पंतप्रधान मोदी यांना निवांत झोपू शकत नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला धडा शिकवायचा हे मोदींनी ठरवले होते. त्यामुळे ते अनेक रात्री निवांत झोपले नाहीत. 


पंतप्रधान मोदी २८-२९ सप्टेंबरच्या मध्यरात्री आपल्या कोर टीम सोबत सात लोक कल्याण मार्ग (७ रेस कोर्स) येथून संपूर्ण ऑपरेशनची देखरेख करत होते. 


पाण्याचा घोटही घेतला नाही...
ऑपरेशन यशस्वी झाले अशी माहिती आली नाही तो पर्यंत मोदी यांनी पाण्याचा एक घोटही घेतला नाही. सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर आणि जेटलींसह एनएसएचे अजीत डोभाल आणि सेनेचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 


ऑपरेशन यशस्वी झाले...
ऑपरेशन यशस्वी झाल्याची वार्ता आल्यावर गुरूवारी मोदी आपल्या जागेवरून उठले आणि आराम करण्याऐवजी त्यांनी या नंतर काय करावे लागेल या कामात स्वतःला व्यस्त करून घेतले.