अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनी अहमदाबादच्या पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ)मध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दाखल केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये त्यांनी, गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर असताना मोदींनी पासपोर्ट बनवला होता तेव्हा त्यांनी लग्नासंबंधी कोणती कागदपत्रं जमा केली होती? असा प्रश्न विचारलाय. 


उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी जशोदाबेन यांनी पासपोर्टसाठी केलेला अर्ज निकालात काढण्यात आला होता. या अर्जात यशोदाबेन यांनी, मोदींशी त्यांचा विवाह झालाय याबाबतचं कोणतंही प्रमाणपत्र किंवा संयुक्त शपथपत्र जोडलं नव्हतं, म्हणून त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. 


याच पार्श्वभूमीवर जशोदाबेन यांनी आरटीआय अर्ज दाखल केलाय. जशोदाबेन यांचा भाऊ अशोक मोदी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय.