पोलिसांची व्हॉटसअपवर मानहानी, पत्रकाराला अटक
रायपूर : पोलिसांविरुद्ध मानहानिकारक मॅसेज व्हॉटसअप ग्रुपमध्ये टाकण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ही व्यक्ती एक पत्रकार आहे.
रायपूर : पोलिसांविरुद्ध मानहानिकारक मॅसेज व्हॉटसअप ग्रुपमध्ये टाकण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ही व्यक्ती एक पत्रकार आहे.
छत्तीसगड राज्यात ही घटना घडलीय. दंतेवाडा जिल्ह्यात प्रभात सिंग नावाच्या पत्रकाराला सोमवारी जगदलपूर इथून अटक करण्यात आलीय. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या पत्रकारानं केलाय.
'पत्रकार सुरक्षा कानून से सिर्फ उन्हें परहेज है जो ऑलरेडी मामा की*** में बैठे है' असा मॅसेज त्याने व्हॉट्सअॅपवर टाकला होता. या मॅसेजमधील 'मामा' हा शब्द पोलिसांना उद्देशून आहे. पत्रकारांमध्ये पोलिसांसाठी हा शब्द उपरोधितपणे वापरला जातो.
सोमारू नाग आणि संतोष यादव या दोन पत्रकारांनाही नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका वृत्त वेब साईटच्या पत्रकारालाही बस्तर सोडून जाण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातोय.