१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!
सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली : सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सिनेमा पाहून प्रेरित झालेला रॉबीनला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बीएमडब्ल्यू आणि टोयोटा फॉर्च्युनर कार ताब्यात घेतली आहे. गुन्हेगारी क्षेत्रात तो गेल्या १४ वर्षांपासून असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
'ओय लकी! लकी ओय!' या सिनेमातून प्रेरित होऊन रॉबीन नावाचा तरुण कार चोरत होता. उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीत प्रवेश करून तेथील आलिशान मोटारींची पाहाणी करून तो चोरी करायचा.
मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांच्या घरात घुसून कारच्या किल्ल्या शोधून कार चोरण्याची त्याची पद्धत होती. आतापर्यंत त्याने १०० पेक्षा अधिक मोटारी चोरल्याचे समोर आले आहे. मात्र बुधवारी अशीच एक कार चोरत असताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.