शहडोल : नोटबंदीनंतर २००० च्या नव्या नोटा आल्या. पण २००० च्या ही बनावट नोटा बाहेर येऊ लागल्या. काही लोकं २००० च्या नकली नोटा छापत आहेत. पोलीस अशा लोकांवर नजर ठेऊन आहेत. मध्यप्रदेशात पोलिसांनी २ लोकांना अटक केली आहे जे नकली नोटा छापत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी २००० ची नकली नोट छापण्याच्या आरोपाखाली पॅथोलॉजी लॅबचा संचालक आणि २ लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून नकली नोटा, स्कॅनर आणि प्रिंटर जप्त केलं आहे. 


आरोपी युवक पेट्रोल पंपवर दोन हजारची नकली नोट चालवतांना पकडला गेला. पोलिसांनी मग त्या युवकाची चौकशी केली. त्यानंतर त्याने पॅथलॉजी लॅबची माहिती दिली आणि पोलिसांनी मग तेथे जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांना एक नोट कचऱ्याच्या डब्यात मिळाली. ती नोट व्यवस्थित प्रिंट झाली नव्हती त्यामुळे कचऱ्यात टाकण्यात आली होती. पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे मग आरोपींना अटक केली.