बंगळुरू : नोटबंदीनंतर देशात पैशाची चणचण भासत आहे. १००० आणि ५०० च्या जुन्या नोटा रद्द केल्या गेल्या. त्यानंतर २००० ची नवी नोट आली पण आता या नोटेचे देखील बनावट नोटा बनवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून अशा अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमध्ये बनावट नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी ४ लोकांना अटक केली असून त्यांच्याकडून २००० च्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.


शशांक, मधु कुमार, किरन कुमार आणि नागराज अशी आरोपींची नावे आहेत. फोटोच्या दुकानात आरोपी नकली नोटा छापत असत. एका दुकानदाराला दिलेल्या नकली नोटेनंतर ही टोळी सापडली. शहरातील ८ दारुच्या दुकांनावर त्यांनी या नोटा वापरल्या होत्या. जवळपास त्यांनी २ हजाराच्या ५० नोटा चालवल्या. हुबेहुब अशी नोट आरोपींनी तयार केली होती. फक्त त्यासाठी वापरलेला कागद हा संशयाला कारणीभूत ठरला.