रायपूर : जर रक्षकच भक्षक झाले तर याला काय म्हणणार. छत्तीसगडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात तैनात पोलिसांवर १६ आदिवसी महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या रिपोर्टनुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये बस्तरमध्ये ही आदिवासी महिलांवर अत्याचार केल्याची घटना घडल्याचं म्हटलं आहे.


याप्रकरणी तपास सुरु कऱण्यात आलाय तसेच महिलांचे जबाबही घेतले जातायत. आरोप आहे की पोलिसांनी बीजापूर जिल्ह्यातील पेगदापल्ली, चिन्नागळूर, पेद्दागळूर, गुंड आणि बर्गीचेरू गावांतील महिलांवर बलात्कार केलाय.