नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं आहे. राहुल गांधींना मंदिर मार्ग चौकीजवळ ताब्यात घेण्यात आलं. राहुल गांधी माजी सैनिकाला भेटण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना ताब्यात घेण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींना RML रुग्णालयाच्या बाहेर रोखण्यात आलं. राहुल गांधीनी म्हटलं की, नवा हिंदुस्तान बनवतायंत पंतप्रधान मोदी. हे लोकतंत्र आहे का ?


राजधानी दिल्लीत वन रँक-वन पेंशनच्या मागणीसाठी एका माजी सैनिकाने विष घेऊन आत्महत्या केली. माजी सैनिक सरकारच्या निर्णयावर खूश नव्हते. त्यामुळे ते जंतर-मंतरवर आंदोलन करत होते. राहुल गांधी माजी सैनिकाच्या परिवाराला भेटण्यासाठी गेले होते.