नवी दिल्ली : मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता १ एप्रिलपासून वाढणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने एजंटचे कमिशन वाढविण्याचे निर्णय घेतल्याने हप्ता महागणार आहे.


एजंटचे कमिशन वाढल्यामुळे विमा हप्त्यात होणारा बदल अधिक अथवा उणे 5 टक्क्यांच्या आतमध्ये असेल. वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आलाय. आता एजंटचे कमिशन वाढल्याने त्यात आणखी भर पडणार आहे. आयआरडीएआय नियामक कायदा 2016 हा 1 एप्रिलपासून लागू होत आहे.