नवी दिल्ली : राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅक मनी व्हाईट होण्याच्या भीतीने जिल्हा आणि सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालणाऱ्या सरकारने आता राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुभा दिली आहे. आयकर कायद्यानुसार राजकीय पक्षांना जुन्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करता येतील, असे अर्थसचिव अशोक लवासा यांनी स्पष्ट केले आहे.



काळा पैशाबाबात सरकारने कडक पावले उचलली आहेत. आयकर विभाग आणि पोलिसांनी आतापर्यंत देशभरात २९१ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात ३१६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात ८० कोटी रुपयांच्या नवीन नोटांचा समावेश आहे.