नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे बोलतात ते करून दाखवतात, या शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पंतप्रधानांचं कौतूक केलं आहे. 


लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी महिला आमदार आणि नगराध्यक्षांसाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी हे वक्तव्य केलं आहे. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.