श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांनी एका जवानाचे डोळे फोडले आहेत. जमावाने या जवानाचा पाठलाग केला, आणि मारत-मारत त्याचे डोळे फोडले. संबंधित जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएसपी श्रीनगर येथील सुरक्षा अधिकारी शफाकत अहमद यांना १४ जुलै रोजी आंदोलकांनी पळून-पळून बेदम मारहाण केली. अहमद हे खाली पडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या डोळ्यांवर हल्ला करत डोळे फोडले. अहमद यांची प्रकृती गंभीर आहे, अहमद त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक प्रसार माध्यमांनी दिली आहे.


 जम्मू-काश्मीरमध्ये  पुलगाम येथेदमहल हांजी पोरा पोलिस स्टेशनवर आंदोलकांनी हल्ला केला, यात  ७० रायफली पळविल्या.  आंदोलक जवानांना घेरून त्यांच्यावर हल्ला करू लागले आहेत. शिवाय, त्यांच्याकडील शस्त्रास्रे लुटताना दिसत आहेत. विविध ठिकाणी जवानांची वाहने पेटवून दिली आहेत.