नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पुण्यातील एका पोलीस दाम्पत्याने नुकतीच एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली आहे. तारकेश्वरी भालेराव राठोड आणि दिनेश राठोड असे या दाम्पत्याच नाव आहे. ते दोघेही पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. जगातील सर्वोच्च शिखर असलेले एव्हरेस्ट सर करणारे हे देशातील पहिलेच पोलीस दाम्पत्य ठरलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हे यश मिळवणारी तारकेश्वरी ही देशातील पहिली महिला पोलrस आहे. तारकेश्वरी आणि दिनेश या दोघांनी २३ मे रोजी एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली. त्याआधी त्यांनी २९ एप्रिलला माऊंट लोभूचे शिखर सर केले होते. एव्हरेस्ट फत्ते झाल्यांनतर त्यांनी माउंट लोह्त्से गाठण्याचा प्रयत्न केला.


मात्र खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही. असे असले तरी एकाच मोहिमेत त्यांनी २ सर्वोच्च शिखरे सर केलीयेत. महत्वाचं म्हणजे अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलय. राठोड दाम्पत्याला साहसी खेळांची आवड आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखरावरही त्यांनी यशस्वीपणे पाऊल ठेवले होते.