अमृतसर : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्तान सीमेवरची गावं रिकामी कराय़ला सुरूवात झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमध्ये सीमेलगतच्या १० किलोमीटरच्या पट्ट्यातली गावं रिकामी करण्यात आली आहेत. या भागात सीमा सुरक्षा यंत्रणेची (BSF) अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आलीय. जम्मूमधलीही सीमेजवळील गावं रिकामी करण्यात येत आहेत. 


पाकिस्तानकडून कोणतीही लष्करी हल्ला झाला तर त्याला तोंड देण्यासाठी भारताचं लष्कर सज्ज झालंय. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तान सीमेपासून १० किलोमीटर अंतरापर्यंतची गावं रिकामी करण्यात आली आहेत. 


या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहेत.