मुंबई : आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट ६.५० टक्‍क्‍यांवर आणि सीआरआर ४ टक्‍क्‍यांवर कायम ठेवले आहे. 


पतधोरण जाहीर करताना रघुराम राजन म्हणाले, यापुढील काळात मॉन्सूनची प्रगती आणि विविध आर्थिक घडामोडी विचारात घेऊन पुढील पतधोरण आढाव्यात व्याजदरकपातीबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले नाहीत.


आर्थिक सुधारणांबाबत अजून कार्यवाही सुरू आहे. विकासाबाबत लक्ष्यही हळूहळू वाढत आहे. चालू वर्षात एप्रिल महिन्यापासून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर पाव टक्का कमी केले होते, असेही राजन यांनी म्हटले आहे.


'यापूर्वी एप्रिलमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे सध्याची महागाईची आर्थिक स्थितीचा विचार करून व्याजदरांबाबत निर्णय घेतल्याने सध्याच्या स्थितीचा विचार करता दर 'जैसे थे' ठेवणे योग्य आहे, असं रघुराम यांनी म्हटलं आहे.