नवी दिल्ली : देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात गेल्या ३ वर्षात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून राहुल गांधी यांना प्रोजेक्‍ट करण्याचा प्रयत्न झाला पण त्यांचा करिष्मा चालला नाही. राहुल गांधी हेच सध्या काँग्रेसचा चेहरा आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला टक्कर देईल असा चेहरा काँग्रेसकडे नाही. राहुल गांधी स्वत: देखील अशी जबाबदारी घेत नाही. केजरीवालांनी तो प्रयत्न तरी केला होता पण राहुल गांधींच्या बाबतीत ही गोष्ट दिसत नाही. सध्या अनेक नेते सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहेत पण राहुल गांधी त्यापासूनही दूर आहेत.


कारण, गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियामध्ये आणि प्रत्यक्ष सामाजिक जीवनातही 'राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारली' हे चित्रच दिसत नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पुन्हा पुन्हा राहुल यांनाच प्रोजेक्‍ट करू पाहत आहेत..त्यामुळेच काँग्रेसच्या या पराभवांचे आता आश्‍चर्यही वाटेनासं झालं आहे. 



पंतप्रधान मोदींचे प्रभावी रोड शो, सभा याच्या तुलनेत राहुल गांधींना तसं फारसं काही जमलेलं दिसत नाही. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपासून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. विरोधी पक्ष म्हणून देखील काँग्रेसला खूप काही कमाल करता आली नाही. राहुल गांधींना जनतेने साफ नाकारलं आहे. जनतेवर प्रभाव पाडण्यात ते अपयशी ठरले आहे. आता काँग्रेस अजून वेगळ्या प्रकारे कसं राहुल गांधींना प्रोजेक्ट करते हे पाहावं लागेल.