नवी दिल्ली : राहुल गांधी असून परिपक्व राजकीय नेते झालेले नाहीत, असा घरचा अहेर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलाय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शीला दीक्षित यांनी हे मत व्यक्त केले आहे.


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी हे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत राहुल गांधी खूप शिकले आहेत. ते बैठकांना उपस्थित असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्या मनातलं बोलतात. तरीही त्यांना अजून वेळ देण्याची गरज आहे. ते अजून तितकेसे मॅच्यअर झालेले नाहीत, असं शीला दीक्षित यांचं म्हणणं आहे.
 
आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा पाचव्या टप्प्याचे मतदान 27 तारखेला होणार आहे. त्यात राहुल गांधींच्या अमेठीचाही मतदार संघाचाही समावेश आहे. अशावेळी निवडणुकीच्या लगीन घाईत राहुल गांधींना हा घरचा अहेर मिळाला आहे.