नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीदांच्या रक्ताची दलाली करतात, अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली. या टीकेवरून आता भाजपनं राहुल गांधींना लक्ष्य करायला सुरुवात केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी अशिक्षित आहेत किंवा त्यांना मानसिक स्वास्थ्य तपासून घ्यायची गरज आहे, अशी टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. भाजपबरोबरच आम आदमी पक्षानंही राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो, दलालीसारखा शब्द त्यांनी वापरायला नको होता, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.