जयपूर : देशद्रोह्यांचं समर्थन करत असतील तर राहुल गांधींना गोळ्या घाला, अशी मुक्ताफळे राजस्थानच्या भाजप आमदाराने उधळली आहेत. तर बाबा रामदेव यांनीही जेएनयू वादात उडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेएनयूमध्ये जाऊन कन्हैया कुमाराच्या समर्थानात उतरलेल्या राहुल गांधींना गोळ्या घातल्या पाहिजेत, असं अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य भाजपचे राजस्थानचे आमदार कैलाश चौधरींनी केलंय. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांच्या समर्थनात उतरणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असंही कैलाश चौधरींनी म्हटलंय.


 


तर जेएनयूच्या वादात आता योग गुरू बाबा रामदेव यांनीही उडी घेतलीय. राहुल गांधींनी देशद्रोहाच्या आरोपी विद्यार्थ्यांचं समर्थन करणं ही सुद्धा गद्दारीच असल्याचं रामदेव बाबांनी म्हटलंय.  ते आज अहमदाबादमध्ये म्हटलंय. 


जेएनयूच्या कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी जेएनयूच्या स्टुडंट युनियनचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात राहुल गांधींनी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये जाऊन समर्थन केलं होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदेव बाबांनी राहुल गांधींचं नाव नं घेता बाबा रामदेव ही टीका केलीय.