नवी दिल्ली : भाजपच्या मंत्र्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा समाचार घेतला आहे. गेले पंधरा दिवस काँग्रेसचे खासदार सभागृहात गोंधळ का घालत आहेत, असा प्रश्न संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी उपस्थित केला. तर बाबुल सुप्रियोंनीही राहुल गांधी बोलले तर काँग्रेसच नुकसान होईल, असं म्हटलंय. तर माहिती आणि प्रसारणं मत्री व्यंकय्या नायडूंनीही काँग्रेसवर शरसंधान साधले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराची माहिती आहे असा आरोप करणाऱ्या राहुल गांधींना भाजपाने पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. राहुल गांधी तथ्यहीन, आधार नसलेले आरोप करत आहेत. त्यांच्याकडे अशी कुठली माहिती असती तर त्यांनी ती 20 दिवसापूर्वीच सादर केली असती, असे केंद्रीय मंत्री अनंत कुमार म्हणाले.



दरम्यान, राहुल गांधींकडे पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत मग ते संसदेबाहेर का ते पुरावे उघड करत नाहीत, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वटरवरुन विचारला आहे.