नवी दिल्ली :  जेएनयू आणि रोहित वेमुला यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार फटकेबाजी केली. 


राहुल गांधीची फटकेबाजी


मोदींना सर्व घाबरतात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मनरेगा चांगली योजना आहे असे जेटलींनी मला सांगितले. 
मी त्यांना सांगितले ते तुमच्या बॉसला सांगा. पण ते काहीच बोलले नाही. जेटलींनी हिंदुस्थानच्या पंतप्रधानांना सांगितले नाही, कारण ते त्यांना घाबरतात. भाजपमधील सर्वजण मोदींना घाबरतात. 


रोहित वेमुला का आत्महत्या केली


देशाची शक्ती एका दलितावर लादली गेली. ते ओझे तो सहन करू शकला नाही.  त्यामुळे त्यांने आत्महत्या केली.   


नरेंद्र मोदी यांनी त्याच्या आईला फोन नाही, त्याबद्दल काहीच बोलले नाही. 


जेएनयू कन्हैयाला केले टार्गेट


जेएनयूमध्ये कन्हैया उभा राहिला. २० मिनिटांच्या भाषणात त्याने जे काही बोलले त्यातील एकही वाक्य देश विरोधी नव्हते.  त्या ठिकाणी ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या ते अजून मोकळे फिरत आहेत. 


गांधी आमचे सावरकर तुमचे 


भाजप आणि संघाला सर्व माहिती आहे. तुम्ही चूक करत नाही. आम्हांला काहीच माहिती नाही. आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. 


एका बाजुला गांधी आणि एका बाजुला सावरकर असे म्हटल्यावर किरीट सोमय्या भडकले. 


गांधी आमचे आणि सावरकर तुमचे असे म्हटलो. सावरकरांना तुम्ही फेकले का. तुम्ही केले तर खूप चांगले केले. 


जेएनयूत अभाविपने माझा अपमान केला


एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या तोंडासमोर काळे झेंडे फडकविले. माझी संभावना केली. मी रागवलो नाही. कारण मी माझ्या तिरंग्याची सुरक्षा करतो होतो.