नवी दिल्ली :  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा रेल्वे बजेट सादर केला. त्यांनी चार नव्या ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर अनेक नव्या योजनांबद्दल सांगितले. प्रभू आपल्या भाषणात काही सूत्र देत होते. त्यांच्याबद्दल बोलत होते. तर या १४ सूत्रांच्या आधारे समजून घ्या प्रभूंचे रेल्वे बजेट 



नव्या ट्रेनचे सूत्र 


१) हमसफर : एकूण ३ एसी ट्रेन असणार आहेत. यात भोजनाचा पर्याय उपलब्ध असणार आहे. 


२) तेजस :  तेजस ही ट्रेन भारताचे ट्रेन भविष्याला दाखविणार आहे. याचा वेग ताशी १३० किलोमीटर असणार आहे. 


३) उदय : ही डबल डेकर असून ही गाडी एसी डब्यांची असणार आहे. ही गाडी रात्रीच चालविण्यात येणार आहे. यात ४० टक्के अधिक प्रवाशांसाठी जागा असणार आहे. 


४) अंत्योदय एक्स्प्रेस : सर्वसामान्य प्रवाशांना अंत्योदय एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे. अंत्योदय एक्सप्रेसमध्ये केवळ अनारक्षित डब्बे असणार आहेत.  ही एक्स्प्रेस लांब पल्ल्यासाठी चालविण्यात येणार आहे. 


प्रवासी सुविधांचे सूत्र 


५) दीन दयालू सवारी डब्बे :  पाणी आणि मोठ्या संख्येत मोबाईल चार्जिंगचे पॉइंट्स असणार आहेत. ही सुविधा अनारक्षित डब्यात असणार आहे. 


६) जननी : लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या  मातांसाठी त्यांच्या गरम पाणी, बेबी फूड आणि दूधांची सुविधा देण्यात येणार आहे. 


७) सारथी :  कोकण रेल्वेपासून याची सुरूवात केली जाणार आहे. यात वरिष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा असणार आहेत. 


८) यात्री सहाय्यक : कुलींना आता यात्री सहाय्यक म्हणून संबोधण्यात येणार आहे. 


९) क्लीन माय कोच :  SMSच्या द्वारे रेल्वे कोचमध्ये स्वच्छतेची व्यवस्था होणार आहे. याच्या ऑडीटची जबाबदारी थर्ड पार्टीची असणार आहे. प्रवाशांच्या फिडबॅकच्या आधारावर कारवाई होणार आहे. 



संशोधन आणि सुधारणा सूत्र 


१०) श्रेष्ठ :  रेल्वेमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी स्पेशल रेल्वे एस्टॅबलिशमेंट फॉर स्टॅटेजिक टेक्नॉलॉजी अँड होलिस्टिक अँडव्हासमेंटची स्थापन करण्यात येणार आहे. यात मोठ्या कालवधीसाठी होणाऱ्या रिसर्चवर लक्ष देणे असे या संस्थेचे काम असणार आहे. 


११) सूत्र :  डेटा विश्लेषणसाठी एका डेडिकेटेड क्रॉस फंक्शनल टीमची स्थापना करण्यात येणार आहे. याला स्पेशल यूनिट फॉर ट्रांसपोर्टेशन रिसर्च ऐंड ऐनालिटिक्स म्हणण्यात येणार आहे. हे डाटाचे विश्लेषण करणणार त्यात अधिक गुंतवणूक आणि प्रक्रियेची गरज पडणार आहे. 


१२) नवारंभ :  रेल्वेत अनेक नव्या सुरूवातींची गरज आहे. यात संघटनात्मक पुनर्संरचना आणि सशक्तीकरणासाठी नवारंभ करण्याची गरज प्रभूंनी बोलून दाखविली. 


१३) नव रचना :  नव रचनेला मदत करण्यासाठी कर्मचारी, स्टार्टअप्स आणि छोट्या उद्योगांसाठी ५० कोटींचा फंड वेगळा ठेवण्यात आला आहे. 


१४) अवतरण : यात भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सात मिशन ठरविण्यात आले आहेत.