नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतेही रेल्वे भाडेवाढ नाही, हा दिलासा देताना मुंबईची उपेक्षा केलेली दिसत आहे. मात्र, नव्याने चार गाड्या सुरु करण्याची घोषणा केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्योदय, हमसफर, तेजस आणि उदय एक्सप्रेस या गाड्या नव्याने सुरु करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना अंत्योदय एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे. अंत्यादय एक्सप्रेसमध्ये केवळ अनारक्षित डब्बे असणार आहेत. तर हमसफर एक्सप्रेस सूंपर्ण वातानुकुलीत (एसी) असणार आहे.


तेजसचे वैशिष्ट्य म्हणजे ही जलद गाडी असणार आहे. या गाडीचा ताशी वेग १३० किलोमीट असणार आहे. तर उदय गाडी ही डबल डेकर असून ही गाडी एसी डब्यांची असणार आहे. ही गाडी रात्रीच चालविण्यात येणार आहे.