रेल्वे बजेट २०१६ : प्रभूंच्या पोतडीतून हे नवीन मिळणार?
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दरवाढ न करता रेल्वेच्या प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा देणारा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अनेक चांगल्या घोषणा केल्यात.
नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दरवाढ न करता रेल्वेच्या प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा देणारा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अनेक चांगल्या घोषणा केल्यात.
मुंबईकरांसाठी गुडन्यूज -
चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल एलिव्हेटड रेल्वे मार्ग उभारण्याचा मानस.
मागेल त्याला आरक्षण -
२०२०पर्यंत अनेक मागेल त्याला आरक्षण, मानवविरहित गेट्स हटवणे, तंत्रज्ञानाचा वापर अशा गोष्टींवर भर देताना रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रभूंनी प्रयत्न केलेला दिसतोय.
प्रकल्पूर्तीवर खास लक्ष -
रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार.
विमा सुरक्षा कवच -
रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवता येण्याची सुविधा उपलब्ध होणार.
महिलांसाठी सुविधा -
जननी सेवा लहानग्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी जननी सेवा सुरू करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. यामध्ये मातांना रेल्वे स्थानकावर बेबीफूड, गरम दूध, गरम पाणी, मुलांचे डायपर बदलण्यासाठी रेल्वेमध्ये टेबल उपलब्ध करून देण्यात येईल.
हमालांचा आरोग्य विमा, सहाय उपयोग -
हमाल नव्हे, सहाय देशभरात रेल्वेप्रवाशांना मदत करणाऱ्या हमालांना यापुढे सहाय असे नवे नाव देण्यात येऊन त्यांच्यासाठी नवा गणवेश आणला जाणार आहे. त्याचबरोबर सर्व हमालांचा आरोग्य विमाही उतरवला जाणार आहे.
तिकीट रद्द शॉर्टकोड सुविधा -
SMSचा वापर रेल्वे डब्याची स्वच्छता करून घेण्यासाठी रेल्वे प्रवासी एसएमएसचा वापर करू शकणार आहेत. प्रवाशांच्या एसएमएसनंतर तातडीने संबंधित डब्याची स्वच्छता होणार. त्याचबरोबर काढलेले तिकीट रद्द करण्यासाठीही १३९ या शॉर्टकोड सुविधेचा वापर
लांबपल्ल्यासाठी अनारक्षीत गाड्या -
देशातील लांबपल्ल्याच्या मार्गांवर अत्योद्य एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून, त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे डब्यामध्ये पाणी आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्यात येतील. रेल्वे प्रवाशांसाठी दिनद्याळ डबेही तयार करण्यात आले आहेत.