नवी दिल्ली : देशात सर्वाधिक प्रवास करणाऱ्यांची संख्या ही रेल्वेतून आहे. मात्र, रेल्वेचे तिकीट वेळेवर मिळेल तर शपथ. मिळाले तर ते वेटिंगचे. अनेक वेळा रेल्वे तिकीट बुकींग सुरु झाले तर पाचव्या मिनिटाला तिकीटेच संपतात. आता या सर्व कटकटीतून तुमची सुटका होणार आहे. रेल्वे आपल्या तिकीट प्रणातील बदल करीत आहे. हा बदल १ जुलै २०१६ पासून लागू होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. जुलै महिन्यापासून वेटिंग तिकीट लिस्टची झंझट असणार नाही. भारतीय रेल्वेकडून आता प्रवाश्यांच्या हातात कन्फर्मच तिकीट मिळणार आहे.


२. जुलैपासून तात्काळ तिकीट कॅन्सल केल्यावर ५० टक्के परतावा रक्कम दिली जाणार आहे.


३. जुलैपासून तात्काळ तिकीट नियमांत बदल होणार आहे. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत एसी कोचची तिकीट बुकींग होईल. ११ ते १२ वाजेपर्यंत स्लीपर कोचचे बुकींग होईल.


४. जुलैपासून राजधानी आणि शताब्दीमध्ये पेपरलेस तिकीट सुविधा सुरु होईल. या सुविधेनंतर या गाड्यांची तिकीटे पेपर असलेली मिळणार नाहीत. तुम्हाला मोबाईलवरच तिकीट उपलब्ध होईल.


५. जवकरच आता वेगवेगळ्या भाषेत तिकीट मिळू शकणार आहे. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी भाषेत तिकीट मिळत होती. आता अनेक भाषा उपलब्ध असणार आहे.


६.रेल्वे तिकीट मिळण्यासाठी मारामारी होत होती. आता १ जुलैपासून शताब्दी आणि राजधानी गाड्यांच्या कोचची संख्या वाढविण्यात येणार आहे.


७. १ जुलैपासून रेल्वे प्रीमियम ट्रेन बंद करण्यात येणार आहे. गर्दीची समस्या दूर करण्यासाठी चांगली सेवा देण्यात येणार आहे. मात्र, याच धर्तीवर दुसऱ्या गाड्यांची योजना आहे.


८. रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून राजधानी, शताब्दी, दुरन्तो आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे सुविधा रेल्वे सुरु करणार आहे.


९. सुविधा रेल्वेच्या तिकीट रद्द करणाऱ्यांना ५० टक्के रक्कम मिळेल. तसेच एसी-२ वर १०० रुपये, एसी-३वर९० रुपये तर स्लीपरसाठी ६० रुपये परतावा मिळले.


१०. तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असाल आणि तुम्ही निवांत झोपला असाल तर स्टेशन पुढे जाण्याची चिंता नको. आता पुन्हाला इच्छीत स्टेशनवर उठविण्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे. मात्र, १३९ क्रमांकावर फोन करुन वेकअप कॉल डेस्टिनेशन अलर्ट आपल्या पीएनआरवर अॅक्टिव्ह करावा लागेल.