भोपाळ : मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे सतना नदीला पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसंच आपत्कालीन यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. लष्कराकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.


दरम्यान, सतना नदीतल्या पुरामुळे अडकलेले सहा जण झाडावर चढून बसले होते. त्या सर्वांना वाचवण्यात लष्कराला यश आले आहे. नौकेच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात उतरुन लष्कराने त्या सर्व सहा जणांचे प्राण वाचवले.