श्रीगंगानगर : दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे. जयदित्य वीर सिंह असं या तरुणाचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयदित्य आणि त्याच्या मित्रांनी या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रेती भरली आणि विटांच्याऐवजी घर बांधण्यासाठी या बाटल्यांचा वापर केला. या टाकाऊ बाटल्यांपासून त्यानं ४ खोल्या तयार केल्या आहेत. एका बाटलीला दुसरी बाटली जोडून या खोल्यांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. 


या खोल्यांची रचनाही शास्त्रीय पद्धतीनं करण्यात आली आहे, त्यामुळे या खोल्या उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहतात. जयदित्यची ही संकल्पना सरकारलाही आवडली आहे. स्किल डेव्हलपमेंट या सरकारी योजनेचा जयदित्यला ब्रँड ऍम्बेसेडर बनवण्यात आलं आहे.