मराठी जवानाच्या घरी फोन करून राजनाथ म्हणाले...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या कुटुंबियांशी फोनवरून बातचित केली आहे. चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राजनाथ सिंग यांनी चव्हाण कुटुंबियांना दिली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या कुटुंबियांशी फोनवरून बातचित केली आहे. चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राजनाथ सिंग यांनी चव्हाण कुटुंबियांना दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरची दबावनीती वापरून सुटकेसाठी प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी कुटुंबाला दिलं. चंदूला पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याच्या धक्क्यामुळे त्याच्या आजीचं निधन झालं. याबद्दलही राजनाथ सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे.
चंदू चव्हाणनं गुरुवारी 29 सप्टेंबरला चुकून सीमारेषा पार केली आणि तो पाकिस्तानी हद्दीत घुसला. चंदू चव्हाण हा धुळ्याचा आहे.