रांची : सीमेपलीकडून असाच गोळीबार सुरु राहिला तर त्याला प्रत्त्युत्तर देताना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी जम्मू काश्मीरमधल्या पंपोरमधल्या दहशतवादी हल्ल्यात, आठ भारतीय जवान शहीद झाले. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यावर राजनाथ सिंह यांनी, झारखंडमधल्या रांचीतल्या सभेत बोलताना हा इशारा दिला. 


दरम्यान पंपोरमधला हल्ला हा दहशतवाद्यांनी निराशेच्या मानसिकतेमधून केला असल्याची प्रतिक्रिया, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. भारतीय सैन्यापुढे दहशतवादी हतबल ठरु लागले आहेत. त्या निराशेतूनच हा हल्ला केला गेल्याचं, पर्रिकर म्हणाले. सुरक्षेतल्या त्रुटींचा कठोरपणे आढावा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.