नक्षलवाद्यांना लगाम घालण्यासाठी अधिक आक्रमक धोरण - राजनाथ सिंग
देशात बोकाळलेल्या नक्षलवाद्यांना लगाम घालण्यासाठी अधिक आक्रमक धोरण अवलंबण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. 10 नक्षलप्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परिषदेचं बीजभाषण करताना त्यांनी नक्षल्यांच्या प्रतिकारासाठी राज्यांनी अधिक जबाबदारी उचलणं आवश्यक असल्याचं म्हटलं.
नवी दिल्ली : देशात बोकाळलेल्या नक्षलवाद्यांना लगाम घालण्यासाठी अधिक आक्रमक धोरण अवलंबण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. 10 नक्षलप्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परिषदेचं बीजभाषण करताना त्यांनी नक्षल्यांच्या प्रतिकारासाठी राज्यांनी अधिक जबाबदारी उचलणं आवश्यक असल्याचं म्हटलं.
बचावात्मक धोरण अवलंबल्यामुळे अनेकदा आक्रमक होण्याची क्षमता कमी होते, असं सिंग म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या परिषदेला उपस्थित होते. जेएनयू, दिल्ली विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये नक्षलवादी समर्थकांना रोखण्याची योजना आखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.