नवी दिल्ली : कश्मीरमधील बारामूलामध्ये ४६ राष्ट्रीय रायफल कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजीत डोवाल यांच्यासोबत चर्चा केली आहे. बारामुला येथील परिस्थितीबद्दल त्यांनी आढावा घेतला आहे. राजनाथ सिंह यांनी हल्ल्यात शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे.


कश्मीरमधील बारामूला येथे लष्कर आणि बीएसएफच्या कॅम्पला दहशदवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं. जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं बोललं जातंय. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. बीएसएफचा एक जवान या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.