लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. राममंदिराच्या मुद्यासह विविध विकासाचे मुद्दे भाजपच्या या जाहीरनाम्यात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संवैधानिक पद्धतीने अयोध्येमध्ये राममंदिर उभारणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केलीय. छोट्य़ा शेतक-यांना कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांना लॅपटॉपसह 1 वर्षाचा मोफत डेटा देणार असल्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आलीय.


कोणताही भेदभाव न करता विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार असल्याचं शाह यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना अमित शाह यांनी सपावर जोरदार हल्लाबोल केला. सपामधील घराणेशाहीवर त्यांनी जोरदार तोंडसुख घेतलं.