नवी दिल्ली : राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं मत  आठवले यांनी व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅट्रॉसिटी कायदा आम्ही रद्द होऊ देणार नाही, अशी भूमिका आठवलेंनी मांडली आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. देशातील दलितांवर वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा बनवण्यात आला आहे, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. 


कोपर्डीतल्या ज्या मुलीवर बलात्कार झाला, तिच्या आरोपींना पकडून कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही केली असल्याचं यावेळी रामदास आठवलेंनी सांगितले. राज ठाकरे नेहमीच दलितविरोधी भूमिका मांडतात.  राज ठाकरेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही.