नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जाट समाजाने केलेल्या आंदोलनादरम्यान १० महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी वर्तमानाच्या रिपोर्टनुसार, सोनीपत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनादरम्यान काही वाहने थांबवण्यात आली. त्यानंतर या वाहनातील महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या महिलांना निर्वस्त्र अवस्थेतच शेतात सोडण्यात आले. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास ३० आंदोलनकर्त्यांनी मुरथलजवळ एनएच१वरुन जाणाऱ्या वाहनांना अडवले. काही वाहनांना आग लावण्यात आली. यात बसचाही समावेश होता. तर यादरम्यान १० महिलेंवर बलात्कारही करण्यात आला. 


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले खरे मात्र पिडीतांना मेडिकल मदत अथवा तपासाच्या ऐवजी या पिडीत महिलांना कुटुबियांना त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच तक्रार दाखल केली जाऊ नये यासाठी दबावही टाकण्यात आल्याची माहिती मिळतेय. अन्य एका रिपोर्टनुसार हरयाणा राज्याचे डीजीपी यशपाल सिंघल यांनी ही सामूहिक बलात्काराची घटना अफवा असल्याचे म्हटलेय.