८ वर्षांच्या चिमुकलीवर हत्येनंतर बलात्कार
दिल्लीच्या सीमेवरील बादली भागामध्ये शुक्रवारी रात्री या मुलीचा मृतदेह सापडला होता.
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील बादली भागामध्ये शुक्रवारी रात्री या मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे, एका नराधमाने आठवर्षाच्या मुलीची हत्या करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदन भुकान असे आरोपीचे नाव आहे. तो १९ वर्षांचा आहे.
मुलगी गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून बेपत्ता होती. त्याने गुरुवारी रात्री मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केली नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या मृतदेहाजवळ एक चप्पल सापडली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. त्यांना घटनास्थळावर महत्वाचे पुराव सापडले होते. त्याआधारावर त्यांनी तपास केला. घटनास्थळाजवळ वीट भट्टीचा एका कारखाना आहे. तेथे काम करणाऱ्या ७० कामगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान चंदन भुकान या वीटभट्टी मजूराने गुन्हयाची कबुली दिली.