सोनं-चांदीच्या भावामध्ये घसरण
जागतिक मंदी आणि कमी मागणीचा फटका सोनं आणि चांदीच्या भावालाही बसला आहे.
नवी दिल्ली : जागतिक मंदी आणि कमी मागणीचा फटका सोनं आणि चांदीच्या भावालाही बसला आहे. दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 30 रुपये प्रति तोळ्यानं पडला आहे. सोन्याचा आजचा भाव 30,900 रुपये एवढा आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या भावामध्येही 50 रुपये प्रतिकिलोनं घसरण झाली आहे. चांदीचा भाव 46,250 रुपये प्रतिकिलो एवढा आहे.