नोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
आयबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज नोटबंदीनंतरचे आकडेवारी लोकासोबत शेअर केली.
१) ६ डिसेंबरपर्यंत ५०० आणि १ हजारच्या साडे अकरा लाख कोटी रुपये परत आले आहेत.
२) आतापर्यंत चार लाख कोटींचे नवीन नोट चलनात आल्या आहेत.
३) ८ नोव्हेंबरपर्यंत देशात एकूण १५ लाख कोटी रुपये ५०० आणि १ हजारांच्या नोटांच्या स्वरूपात होते.
४) १ हजार रुपयांची नव्या नोटा आणण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.
५) जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची अंतीम तारीख ही ३० डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. ज्यांना नोट जमा करण्यात अडचणी आल्यात त्यावेळी त्यांना रिझर्व बँकेच्या स्पेशल सेंटरवर जाऊन नोट जमा करू शकणार आहेत. पण आतापर्यंत का नोट जमा करू शकले नाही याचे कारण सांगावे लागणार आहे.
६) सध्याच्या आकडेवारीवरून लक्षात येते की बँक आणि एटीएमच्या रांगा लवकरच संपणार आहेत.